PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना 14 वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचे अपडेट्स समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे (PM Kisan Yojana) बघितलं जाते. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो अल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेती करत असताना शेतकऱ्याला आर्थिक हातभार लागावा हा या योजनेमागील सरकारचा उद्देश आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत एकूण 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असून तमाम शेतकरी वर्ग आता 14 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे.

याच दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Yojana) 14 व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार किसान पीएम योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात या महिन्याच्या शेवटी जमा केला जाणार आहे. सरकारकडून मात्र याबाबत अजून माहिती मिळाली नाही. परंतु जर या महिन्याच्या अखेरच्या दिवसात 14व्या हप्त्याच्या रूपाने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर शेतीसाठी त्याला मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी E- KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनाच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने E- KYC प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचा तेरावा हप्ता व्हेरिफिकेशन न केल्यामुळे अडकून पडलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करून घ्यावे. म्हणजेच त्यांना 13 वा हप्ता आणि 14 वा हप्ता सोबतच मिळू शकेल.

2000 रुपयांचा हप्ता जमा झाला कि नाही ते असे चेक करा – (PM Kisan Yojana)

1) सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट  http://www.pmkisan.gov.in/ वर जा.
2) आता Farmers Corner वर क्लिक करा.
3) आता Beneficiary Status या ऑप्शन वर क्लिक करा.
4) आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
5) येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
6) यानंतर तुम्हाला तुमच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.