हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएसएनएल या भारत सरकारच्या दूरसंचार कंपनीने आता देशातील अनेक शहरांमध्ये १५०० जीबी फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना फक्त तेलंगणा आणि चेन्नई सर्कलमध्येच उपलब्ध होती परंतु आता तमिळनाडूमध्येही ही सेवा सुरू केली जात आहे. तसेच कंपनीने यासाठी आपल्या ९९ रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरमध्येही बदल केला आहे. आता या व्हाउचरमध्ये २२ दिवस विनामूल्य पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) ही सेवा दिली जात आहे. या सेवेसाठी कंपनी दरमहा ३० रुपये शुल्क घेते आणि प्रत्येक गाण्याच्या निवडीसाठी युझर्सला १२ रुपये द्यावे लागतात.
९९ रुपयांची ही योजना २२ दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य पीआरबीटी आणि २५० एफईपी मिनिटांसह अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देते. यानंतरच्या कॉलिंगसाठी बेस टॅरिफ आकारला जातो.
या शहरांना एफटीटीएच योजनेचा लाभ घेता येणार आहे
या वृत्ताला दुजोरा देत बीएसएनएलचे ज्यूनियर टेलीकॉम ऑफिसर(जेटीओ) एन. सुरेंदर म्हणाले की, ४९९ रुपयांपासून ते १९९९ रुपयांपर्यंतच्या या योजना आता ओमलूर, मेट्टूर, संकगिरी, तिरुचेनगोडे, सालेम, येरकॉड, अतूर, वलापडी, रासीपुरम, नमकक्कल या सर्कल मध्ये उपलब्ध आहेत. ओडिशा आणि पुडुचेरी शहरातील भवानीपटना येथे १५०० जीबी एफटीटीएच योजना आणि इतर एफटीटीएच योजना देखील सुरू केल्या आहेत. १,४९९ रुपये किंमतीची १५०० जीबी एफटीटीएच प्लॅन, ज्यामध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा आहे आणि २०० एमबीपीएसची १५०० जीबी हाय-स्पीड इंटरनेट आहे, त्यानंतर ही गती २ एमबीपीएसपर्यंत कमी होईल.
या प्लॅनची डिटेल्स जाणून घ्या
कंपनीच्या साइटवर बीएसएनएलच्या ७४९ एफटीटीएच प्लॅनचे नाव ‘सुपर स्टार ३०० एफटीटीएच’ आहे. या प्लॅनमध्ये ३०० एमबी पर्यंत ५० एमबीपीएसचा टॉप स्पीड मिळेल आणि त्यानंतर २ एमबीपीएस हा वेग कमी होईल. बीएसएनएलच्या ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉलची सेवाही यामध्ये मिळतील आणि हॉटस्टार प्रीमियमचे कॉम्प्लीमेंटरी सब्सक्रिप्शनही मिळेल. दुसरीकडे, ८४९ रुपयांच्या एफटीटीएच योजनेत ६०० जीबी डेटावर ५० एमबीपीएस स्पीड मिळेल आणि त्यानंतर २ एमबीपीएस हा वेग कमी होईल आणि यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग बेनिफिट्स (लोकल + एसटीडी) असतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.