सोलापुरात बसपाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर भूमीत प्रचंड वेगाने घडामोडी होत आहेत. तिरंगी लढत असणाऱ्या सोलापुरात वंचीत आघाडी ला पाठींबा देण्याचा निर्णय प्रदेश महासचिव ऍड. संजीव सदाफुले आणि माघार घेणारे उमेदवार राहुल सरोदे यांनी आज ही घोषणा केली.

सरोदे म्हणाले देशभरात बाबासाहेबांची चळवळ सुरू असताना सोलापुरात काँग्रेस आणि भाजप च्या दलालांनी प्रकाश आंबेडकरांना घेरण्याचे काम करत आहे. एकत्र मिळून आंबेडकरवाद पुढे न्यायचा असेल तर आम्ही तयार आहोत. सोलापुरातील जनभावनेचा विचार करता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू जर थांबत असतील तर बसपा या निवडणुकीत माघार घेत आहे अशी घोषणा केली. ऍड संजीव सदाफुले म्हणाले देशभरात मायावती यांना पंतप्रधान बनविन्यासाठी प्रतिसाद वाढत आहे.

महाराष्ट्रात आणि देशात आंबेडकरी चळवळ मजबूत करायची असेल तर एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि बाबसाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर हे रिंगणात आहेत. चहू बाजूला मनुवाद्यांनी घेरलेलं असताना बसपा ने आपल्या बैठकीत वंचीत बहुजन आघाडी ला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी अनेक कार्यकर्ते आणि शहरातील नेते उपस्थित होते.

दरम्यान बसपा ला हा निर्णय आनंद चंदनशिवे यांच्या मुळे घ्यावा लागला अशी शहरात चर्चा आहे. कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर निवडणुकीत थांबत असतील तर पक्षाने पाठींबा न दिल्यास आपण पक्षातून बाहेर पडत वंचीत आघाडी ला पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगवायला शिकवलं त्या आंबेडकर घराण्यातील व्यक्ती जर निवडणुकीला थांबत असेल तर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले होते. यावेळी शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरून वाहत होता.

प्रकाश आंबेडकरांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर