हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी केंद्र सरकारने काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल फोन आणि त्याचा चार्जर स्वस्त होणार आहे. देशांतर्गत मोबाईल निर्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परदेशी छत्र्या, शेतीसाठी उपकरणे, जेम्स अँड ज्वेलरी, चामड्याच्या वस्तू, चपला आणि बूट, स्वस्त करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे नोकरवर्गाला मात्र कोणताही दिलासा मिळाला नाही. जुनी कर रचनाच इथून पुढेही चालु राहील. त्यामुळे नोकरदारांची निराशा झाली आहे. क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग झाली आहे. छत्र्या महाग होणार आहेत तसेच आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.