व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आमच्यातील गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच मस्तीची भाषा : आ. जयकुमार गोरे

सातारा – एक दोन निवडणूकांमध्ये आमच्यातीलच काही गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच हुरळून जात मस्तीची भाषा सुरु झालीय. पण मस्ती उतरविण्यात माझी पीएचडी झालीय हे विसरु नका. मी तीन वेळा आमदार होवूनही जमिनीवर आहे. माझ्या विरोधात अनेकांनी पैसा ओतलाय. पैसा संपेपर्यंत त्यांना मी बसू दिले नाही. मतदारसंघातील राष्ट्रवादीवालेही म्होरक्याला पैसा संपेपर्यंत खाली बसू देत नाहीत. सध्या काय काय आणि किती मिळतेय याकडेच राष्ट्रवादीवाल्यांचे लक्ष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाकडे किती पैसा आहे याचा हिशोबही लवकरच होणार आहे. त्यामुळे,जरा सबूरीने घ्या असा सल्ला माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला आहे.

कुळकजाई येथे 11 कोटींच्या घाटरस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी आ. जयकुमार गोरे, अर्जुमनतात्या काळे, जयकुमार शिंदे, सोमनाथ भोसले, सरपंच विक्रम जगताप, विलासराव देशमुख, किसनराव सस्ते, बाळासाहेब कदम, गोरख मदने, सदाशिव खाडे, भिवाजी कापसे, आनंद पवार, चंदू सुर्यवंशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीदरम्यान मी आणि रामराजेंनी जुळवून घेतल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यांच्यासारख्या पापी माणसाचे आणि माझे कधीच जुळणार नाही. मंत्रीपदावर असताना त्या माणसाने प्रयत्न केले असते तर माण आणि खटाव हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला असता. त्यांनी या भागाला पाण्यापासून कायम वंचीत ठेवण्याचाच प्रयत्न केला अशी टीका जयकुमार गोरेंनी केली आहे.