Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ

Budget 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.

यावेळी सरकारने खेळणी आणि त्याचे पार्ट्स तसेच एक्सेसरीजवरील आयात शुल्कात 70 टक्क्यांपर्यंतने वाढ केली आहे. ज्यानंतर आता विदेशी खेळणी खरेदी महागणार आहे. या उत्पादनांची आयात कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादन क्रियाकलापांना गती देणे हा यामागील उद्देश आहे. Budget 2023

Toy majors to reduce sourcing from China, eye new destinations - The Hindu  BusinessLine

इलेक्ट्रॉनिक खेळण्यांवरील आयात शुल्कात वाढ नाही

यावेळी सायकलवरील आयात शुल्कातही 30 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढ केली गेली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक खेळण्यांवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आलेली नाही यापूर्वी, फेब्रुवारी 2020 मध्ये, स्थानिक पातळीवरील खेळण्यांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी खेळण्यांवरील बेसिल सीमा शुल्क 20 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले होते.

13 Ways To Get Free Toys - Radical FIRE

2021-22 मध्ये खेळण्यांची आयात 870 कोटी रुपयांनी झाली कमी

एकेकाळी देशात 2,960 कोटी रुपयांची खेळणी आयात करण्यात येत होती. मात्र सरकारच्या निर्णयांमुळे 2021-22 मध्ये ही आयात 870 कोटी रुपयांवर घसरली. तसेच, 2021-22 मध्ये खेळण्यांची निर्यात 61 टक्क्यांनी वाढून 2,601 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

How Do Toys Affect A Child's Development - MetroSaga

आयात शुल्क म्हणजे काय ??

आयात कर हा तो टॅक्स आहे जो एखाद्या देशाचे सीमाशुल्क अधिकारी त्या देशातील दुसर्‍या देशातून येणार्‍या मालावर (आयातित माल) वसूल करतात. तसेच हा माल कोणत्या देशाचा आहे आणि इतर अनेक घटकांवर आयात शुल्काची रक्कम अवलंबून असते. त्याला कस्टम ड्यूटी, दर, आयात कर किंवा आयात शुल्क असेही म्हंटले जाते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiabudget.gov.in/doc/budget_speech.pdf

हे पण वाचा :
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त
Share Market : अर्थसंकल्पाचा विमा कंपन्यांना फटका, शेअर्समध्ये झाली 14 टक्क्यांपर्यंतची घसरण
Budget 2023 : आता PF मधून पैसे काढल्यावर द्यावा लागणार कमी TDS, जाणून घ्या कोणाला होणार फायदा
Post Office च्या ‘या’ योजनेमधील डिपॉझिटच्या लिमिटमध्ये झाली वाढ !!!
New Tax Slab vs Old Tax Slab : जुन्या अन् नवीन स्लॅबमध्ये काय फरक आहे??? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल ते पहा