हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणाल्या कि, सरकारने रेल्वेमार्गाच्या २७ हजार किलोमीटर विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासह, तेजस ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार असून, त्याद्वारे देशातील पर्यटनस्थळे जोडली जातील. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनच्या कामाला वेग दिला जाईल. पीपीपी मॉडेलअंतर्गत १५० नवीन खासगी रेल्वे गाड्या चालवल्या जातील. याशिवाय बेंगळुरूमध्ये १४८ किमी उपनगरीय रेल्वे यंत्रणा तयार केली जाईल. केंद्र सरकार २५% निधी देणार. यासाठी १८ हजार ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
२७ हजार किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण
रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री म्हणाल्या की, २७ हजार किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाईल. सौरऊर्जा क्षमतेसाठी रेल्वे ट्रॅकचे पॉवर ग्रीड तयार केले जातील. सौरऊर्जा ग्रीड रेल्वेच्या जागेवर तयार करण्यात येईल.
तेजससारख्या गाड्यांची संख्या वाढवणार
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात खासगी गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला. अर्थमंत्री म्हणाले, तेजस एक्स्प्रेससारख्या गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. सरकारने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर १५० नवीन खासगी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हायस्पीड रेल्वेचे काम वेगवान केले जाईल.