हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांमध्ये वाढत्या फसवणूकीच्या प्रकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँक प्रकरणानंतर एका गोष्टीची सर्वात मोठी चिंता अशी होती की जर एखादी बँक बुडली तर बँक खातेदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळं बँक खातेधारकांच्या खात्याचे रक्षण करण्यासाठी ठेव विमा १ लाख रुपये होता. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्प घोषणेत म्हटले आहे की,त्याची मर्यादा आता १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळं यापुढे बँक जरी बुडाली तरी खातेदारांची ५ लाखांपर्यंत रक्कम विमा रूपात मिळणार.
Finance Minister Nirmala Sitharaman: Deposit Insurance and Credit Guarantee Corporation has been permitted to increase deposit insurance coverage to Rs 5 lakh per depositor from Rs 1 lakh https://t.co/sUftk0mn1W pic.twitter.com/8YFIRaUcWh
— ANI (@ANI) February 1, 2020