संरक्षण भिंत बांधणे हा उपाय नाही, पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवा; फडणवीसांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात 171 किमीची संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या संरक्षण भिंतीचा काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कल्पनेला विरोध केला आहे. भिंत बांधण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागात वळवा अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, संरक्षण भिंत बांधणे हा त्याच्यावरचा उपाय नाही कारण भिंत बांधली तरी त्याच्यावरून हे पाणी येणार आहे कारण त्या पाण्याचा वेग आणि दाब इतका प्रचंड आहे कि भींत बांधून उपयोग होणार नाही त्यापेक्षा पुराचे पाणी आपण दुष्काळी भागात वळवले पाहिजे कारण लॉन्ग टर्म सोलुशन तेच आहे असं म्हणत हे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी फडणवीसांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा पूरग्रस्त भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की आमचे दौरे महत्त्वाचे आहेत कारण आम्ही गेलो तरच शासकीय यंत्रणा जागी होते आणि कामाला लागते. आम्ही जातो तेव्हा शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच. कारण सरकारनं तसा जीआरच काढलेला आहे. पण आमचे दौरे यासाठी गरजेचे आहेत की, आम्ही गेल्यामुळे कुठेतरी शासकीय यंत्रणा कामाला लागते असे फडणवीसांनी म्हंटल.