Buldhana Bus Accident : अपघाताचे थरारक Photos; बसचा उरला फक्त सांगाडा

Buldhana Bus Accident Photos
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे (Buldhana Bus Accident) काल रात्री एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसला आग लागून तब्बल 25 प्रवाशांचा जिंवतच होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे सम्रुद्धी महामार्गावरून प्रवास करताना पुन्हा एका सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident

नागपूरहुन पुण्याला जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस रात्री 1 वाजता सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात पलटी झाली. पिंपळखुटा गावात रस्त्याकडेला असलेल्या खांबाला बसची जोरात धडक बसली आणि बस जाग्यावरच पलटी झाली. यानंतर डिझेल टॅंकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident

आग लागल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. काही जणांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु बस पूर्णपणे पलटी झाल्याने (Buldhana Bus Accident) बाहेर पडण्याचे दरवाजे बंद होते. यावेळी 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ड्राइव्हरसह 4 जण बचावले आहेत.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident

या अपघातात बसचा फक्त सांगाडा उरला आहे, तर प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणे सुद्धा अशक्य झालं आहे. मृतांची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून डीएनए चाचणी करूनच मृतांची ओळख पटवली जाणार आहे.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचं तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

Buldhana Bus Accident
Buldhana Bus Accident

समृद्धी महामार्ग प्रवासासाठी (Buldhana Bus Accident) सुरु करण्यात आलयापासून सातत्याने या महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.