हृदयद्रावक ! दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या मामा आणि दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. मृत व्यक्तींची नावे विनायक गाडगे,तेजस गाडगे,मामा नामदेव वानखेडे अशी आहेत.

काय घडले नेमके
विनायक गाडगे हा पुणेमध्ये नोकरीला होता. लॉकडाऊनमुळे सोमवारी तो धानोरा येथे घरी आला होता. त्याच्याबरोबर त्याच्या काकाचा मुलगा तेजस हा देखील होता. त्यावेळी त्यांचे मामा नामदेव वानखडे हे दाताळा येथून आपल्या बहिणीला लग्न समारंभासाठी न्यायला धानोरा या ठिकाणी आले होते. यावेळी मामा आणि भाचे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना पोहण्याची ईच्या निर्माण आली आणि ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. यानंतर धरण परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळले. मात्र तेव्हा खूप रात्र झाल्याने त्यांचा शोध घेण्यात आला नाही. आज सकाळी जेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा त्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. यानंतर त्यांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment