Monday, January 30, 2023

भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच बाबांच्या आश्रमावर बुलडोजर; कंप्युटर बाबा पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्य प्रदेश सरकारने आज सकाळी कंम्प्युटर बाबा यांच्या जमुडिहाबाशी आश्रमावर बुलडोझर चालवला. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात हिंदू साधूच्या आश्रमावर बुलडोझर चालवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इंदोर प्रशासनाने रविवारी सकाळी कंप्युटर बाबांच्या आश्रमावर धडक कारवाई केली. कंप्युटर बाबांकडून करण्यात आलेलं अतिक्रमण तातडीनं हटवण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं बुलडोजर आणून कारवाई केलीय. या कारवाईला विरोध करणाऱ्या कंप्युटर बाबांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जिल्हाधिकारी मनीष सिंह, एडीएम अजय देव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जमुडिहाबाशी गावात नामदेव दास त्यागी (कंप्युटर बाबा) यांनी केलेले अतिक्रमण हटविले असून एडीएम अजयदेव शर्मा व अन्य एसडीएम व पोलिस अधिकाऱ्यांची टीम आज सकाळपासून कारवाई करीत आहे. कंप्युटर बाबांच्या आश्रमातील बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. या घटनेचा काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत याचा निषेध केलाय.

- Advertisement -

कंप्युटर बाबांच्या गोमतीगिरी आश्रमातील बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने सुरू करण्यात आली. त्यावेळी स्थानिक आणि आश्रमातील व्यक्तींनी या कारवाईत व्यत्यय आणू नये म्हणून पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे. सकाळी 8 वाजता ही कारवाई सुरू झाली आहे. पालिकेनं पक्क्या बांधकामावर हातोडा घातला आहे. कारवाईचा निषेध करणाऱ्या बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’