भाग…भाग…! : साताऱ्यात टेस्ट राईडच्या बहाण्याने बुलेट पळविली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातार्‍यात टेस्ट राईड मारण्याच्या बहाण्याने एकाने चक्क बुलेट पळवून नेली. शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. बुलेट घेवून गेलेला बराचवेळ झाला परत न आल्याने बुलेट चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार आरीफ शेख यांचा शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी बुलेट विकायची असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यासंबंधी एकाने पुण्यातून बोलत असल्याचे सांगून व व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करून बुलेटची माहिती घेतली. किमतीबाबत विचारणा झाल्यानंतर फायनल किंमत शेख यांनी सांगितली. त्यानुसार सोमवारी संबंधित व्यक्ती पुण्यातून आली.

आरीफ शेख यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बुलेटची ट्रायल घेतो, असे सांगून त्यांनी बुलेटला किक मारली. बुलेट ट्रायलसाठी घेवून गेल्यानंतर अर्धा तास होवून गेल्यानंतरही संबंधित व्यक्ती न आल्याने शेख यांनी शोधाशोध केली. बुलेट व संबंधित व्यक्ती येत नसल्याने व ते सापडत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.