सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- लोणंद मार्गावर असलेल्या आरळे गावानजीक कदम पेट्रोल पंपासमोर चालत्या इलेक्ट्रिक बाईकने आज दुपारी अचानक पेट घेतल्याने मोठं नुकसान झालं आहे. आगीमध्ये संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. बॅटरीमधून शॉर्टसर्किट झाली असल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून जवळ असलेल्या आरळे गावानजीक ही दुर्घटना घडली. इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीमधून शाॅर्टसर्किट झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याने व आगीत खाक झाल्याने बाईक वापरणाऱ्याच्यांत भीतीचे वातावरण निर्माण होवू शकते. सध्या वाढत्या पेट्रोल दरवाढीमुळे इलेक्ट्रीक बाईक खरेदीकडे लोकांचा मोठा कल दिसून येत आहे.
इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याने घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी केली होती.. बाईकला लागलेली आग विझावण्याचा नागरिकांकडून प्रयत्न केला गेला. मात्र, यात अपयश आल्याने बाईक जळून खाक झाली.