‘बळीराजा’ संघटनेकडून कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे केलेले आहेत. त्याचा सर्व देशभरातून निषेध केला जातो आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कायदे सरकारने तत्काळ रद्द करावेत,”अशी मागणी करीत बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कराड तालुक्यातील टाळगाव येथे रविवारी कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन करण्यात आले.

टाळगाव येथील आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष्य पंजाबराव पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, “केंद्र सरकारने केलेलया या काळ्या कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुर, माणूस संपूर्ण उद्धवस्त होणार आहे. याला विरोध करण्यासाठी टाळगाव येथे गोळीच्या सणादिवशी पेटविल्या होळीमध्ये कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रती जाळून आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत.

आमच्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारे प्रतिकात्मकरीतीने काळे कायद्याची परत तयार करून त्याचे होळीत दहन करावे.टाळगाव येथे केलेल्या अनोख्या पपद्धतीच्या आंदोलनात गावातील शेतकरी, महिलानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत बोंबहि मारली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group