राजाबाजारातील मानाची होळी साध्या पध्दतीने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील राजाबाजारचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती चौकात मानाच्या होळीेचे अत्यंत साध्या पध्दतीने पूजन करण्यात आले. यावेळी मा. नंदकुमार घोडेले, सिटीचौक पोलीस ठाण्याचे पी.आय. संभाजी पवार यांच्यासह मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत होलिका पूजन करण्यात आले.

यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कुणीही रस्त्यावर रंग न खेळता घरच्या घरीच सण साजरा करावे तसेच कुठलेही गालबोट लागू न देणे याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे गंभीर संकट देशासह राज्यावर पसरले आहे. शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर चौकातील होळी ही मानाची म्हणून ओळखली जाते. येथील होळीला सुमारे १५० वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा आहे.

दरवर्षी संस्थान गणपती ट्रस्टसोबत राजाबाजार मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने होळी सण साजरा केला जातो. परंतु यंदा वाढत्या कोरोनामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment