हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तरप्रदेश येथे गोळीबार झाला होता. यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड पळस सुरक्षा देऊन त्यांनी ती नाकारली. याच दरम्यान केंद्र सरकार वर टीका करताना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा असे विधान त्यांनी केले.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मी मृत्यूला घाबरत नाही. एक ना एक दिवस सर्वांना मरायचेचं आहे. मी या देशात पैदा झालो आहे. जेव्हा माझे डोळे बंद होईल तेव्हा मला औरंगाबादच्या जमिनीत दफन केले जावे, असे ते म्हणाले. ओवेसींच्या या वक्तव्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे
दरम्यान, ओवेसींच्या या विधानाचा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी खरपूस समाचार घेतला. ओवेसींनी औरंगाबादमध्ये दफन विधीची इच्छा व्यक्त करुन त्यांचे खरे दात दाखवले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळेच त्यांनी दफनविधीसाठी औरंगाबादची इच्छा व्यक्त केली आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.