अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील पीक कापणीचे काम उरकून अमरावतीहून मध्यप्रदेशाला घरी परतणाऱ्या मजूरांच्या कारचा अमरावती-बैतूल महामार्गावर रात्री उशिरा अपघात (car accident) झाला. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू (car accident) झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातातील (car accident) सर्व मजूर हे गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये शेतमजुरीसाठी आले होते. खरीप हंगामातील पिकांची कापणीचे काम संपल्यानंतर हे मजूर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील झाल्लार या गावी परतत होते. रात्री दोन वाजता मजुरांचे गाव झाल्लार अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असतानाच ड्रायव्हरला अचानक डुलकी लागली आणि हा भीषण अपघात (car accident) झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झाला.
हा अपघात खूप भीषण होता. या अपघातात (car accident) दोन मुलांसह एकूण 11 जण जागीच ठार झाले आहेत. सर्व मृतांचे मृतदेह झाल्लार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सर्व मृता झाल्लार गावातील रहिवासी होते. या अपघातावर (car accident) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी 11 मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींच्या पुढच्या व्यक्तींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी