हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला शेतीशी संबंधित एखादा व्यवसाय करायचा असेल तर फुलांची शेती करता येईल. यासाठी शेतीच्या कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नसून फक्त शेतीची बेसिक माहिती देखील पुरेशी ठरेल.
हे लक्षात घ्या कि बाजारात फुलांना खूप मागणी असते. कारण त्याचा वापर सुख-दुःखाच्या प्रसंगी होतो. याशिवाय प्रत्येक फुलाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. काही अत्तरासाठी तर काही औषधासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग फुलांच्या शेतीविषयीची सर्व माहिती जाणून घेउयात…
फुलांची शेती कशी सुरू करावी ???
यासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही हे आधी पाहावे. कारण अशी अनेक फुले आहेत ज्यांना पाणी लागते. यासोबतच हवामानानुसार फुलांची लागवड करावी. याबरोबरच शक्य असेल तर आपल्या क्षेत्रानुसार कोणती फुले लावावीत याबाबत तज्ञांकडून सल्ला घेता येईल. तसेच यासाठी सिंचनाची चांगली व्यवस्था देखील असावी. जर एखाद्याला हवे असेल तर पॉलीहाऊसमध्येही फुलांची शेती करता येईल. Business Idea
भारतात घेतल्या जाणाऱ्या फुलांच्या पिकांची माहिती
हे लक्षात घ्या काही फुले अशी आहेत ज्यांना खूप मागणी असते. यामध्ये गुलाब झेंडू, जरबेरा, कंद, चमेली, ट्यूबरोज, ग्लॅडिओलस, क्रायसॅन्थेमम आणि एस्टर बेली इत्यादींचा समावेश आहे. Business Idea
व्यवसाय
आपल्याला फुले बाजारात नेऊन विकावी लागतील. यासाठी जवळच्या बाजारातील फुलांच्या दुकानात किंवा परफ्यूम, अगरबत्ती यांसारख्या कंपन्यांना विकता येतील. असे केल्याने फुलांना चांगली किंमत मिळेल. याशिवाय, आपण स्वत: बाजारात ती विकता येतील. यामुळे नफा थोडा जास्त वाढू शकेल. Business Idea
खर्च आणि नफा
हे जाणून घ्या कि, प्रत्येक फुलाला वेगवेगळा भाव मिळतो. त्यामुळे यासाठी नक्की किती नफा होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. 1 हेक्टर जमिनीत शेती करण्यासाठी 25 हजार रुपये खर्च होतील. तर भाड्याने शेत घेऊन शेती करणार असाल तर खर्च वाढेल. त्याच वेळी, 1 हेक्टरमध्ये एक वेळच्या लागवडीतून जवळपास 75,000 रुपये मिळू शकतील. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://nhb.gov.in/schemes/subsidy-claim-guidelines.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा
ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!
EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा