Business Idea : कमी गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून मिळवा हजारो रुपये !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : अनेक लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. मात्र कधी कधी व्यवसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा किंवा त्यासाठी लागणाऱ्या भांडवलाच्या कमतरतेमुळे अनेकांना तो करता येत नाही. चला तर मग आज आपण दरमहा चांगली कमाई मिळवून देणाऱ्या स्टेशनरीच्या व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. विशेषत: शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे असलेल्या परिसरात तर स्टेशनरीच्या व्यवसायाला मोठी मागणी असते.

Scope Of Stationery Business In India - RankMe1

हे लक्षात घ्या कि, सध्या लोकं आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत खूपच जागरूक झाले आहेत. आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रकारच्या स्टेशनरी देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. पेन्स, पेन्सिल, A4 आकाराचे कागद, नोटपॅड इत्यादी वस्तू स्टेशनरीमध्ये मोडतात. याचबरोबर ग्रीटिंग कार्ड, लग्नपत्रिका, गिफ्टकार्ड अशा वस्तू विकून अतिरिक्त पैसेही कमवता येतील. Business Idea

How to start a stationery supply business in South Africa - My South Africa

‘शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट एक्ट’ अंतर्गत दुकानाचे रजिस्ट्रेशन करावे लागेल

स्टेशनरीच्या दुकानासाठी सुमारे 400 चौरस मीटर जागा लागेल. तसेच या व्यवसायासाठी ‘शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट एक्ट’ अंतर्गत दुकानाचे रजिस्ट्रेशन देखील करावे लागेल. याची खास बाब अशी कि, हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीद्वारेही सुरू करता येईल. एका चांगल्या स्टेशनरीच्या दुकानासाठी 50 हजार रुपये लागतील. यामध्ये सुरुवातीला आपल्या बजेटनुसार पैसे गुंतवता येतील. Business Idea

The importance of stationery – Pac Milano

व्यवसायाचे मार्केटिंग

आपल्या स्टेशनरी दुकानाच्या मार्केटिंगसाठी दुकानाच्या नावाचे पॅम्प्लेट छापून ते जागोजागी वाटता येतील. याशिवाय शाळा, कोचिंग इन्स्टिट्यूट आणि कॉलेजमध्येही जाऊन विद्यार्थ्यांना दुकानाबद्दलची माहिती देता येईल. याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मार्केटिंग करता येईल. तसेच होम डिलिव्हरीची सुविधाही देऊन आपला व्यवसाय लवकर वाढण्यास मदत होऊ शकेल. Business Idea

How to treat your money with care, respect - The Economic Times

किती नफा मिळेल ???

हे लक्षात घ्या कि, स्टेशनरी दुकानात ब्रँडेड प्रॉडक्ट्स विकून 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कमाई करता येते. त्याचबरोबर स्थानिक उत्पादने विकून 2 ते 4 पट नफा मिळू शकेल. जर स्टेशनरी दुकानासाठी 50 हजार रुपये गुंतवले असतील तर एका महिन्यात 20 हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतील. Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :

घरबसल्या अशा प्रकारे मिळवा आपले हरवलेले Voter ID !!!

Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!

जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

Gold Price Today : सोन्या-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Leave a Comment