हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण एका अशा बिझनेस आयडिया बाबत जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे खूप मोठी कमाई करता येऊ शकेल. तर, आपण कार्ड प्रिंटिंगच्या व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत हा व्यवसाय जास्त फायदेशीर ठरू शकेल. तसेच चांगल्या नियोजनाद्वारे हा व्यवसाय आपल्यासाठी चांगल्या उत्पन्नाचा एक स्रोत देखील बनू शकेल.
वर्षभर मागणी
या व्यवसायाची सर्वांत खास बाब अशी कि यासाठी वर्षभर मागणी देखील असते. इथे हे लक्षात घ्या कि, सध्याच्या काळ्या फक्त लग्नासाठीच नाही तर वाढदिवस किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांसाठीही कार्डचे प्रिंटिंग केले जाते. वर्षभर असे कार्यक्रम सुरू असल्याने हा व्यवसाय आल्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. Business Idea
चांगल्या आणि लेटेस्ट डिझाइन देणे महत्वाचे ठरेल
कार्ड आणखी सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी चांगले डिझायनिंग असणे खूप महत्वाचे आहे. कार्ड प्रत्येकजण छापू शकतो, मात्र चांगले डिझाइन करणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. सध्या इंटरनेटवर देखील अनेक डिझाइन्स उपलब्ध आहेत. मात्र जर आपण कार्ड प्रिंटिंगच्या व्यवसायात उतरत असाल, तर स्वतःचे वेगळेपण असणे खूप महत्त्वाचे ठरेल. हे लक्षात घ्या कि, कार्डचे डिझाईन दरवर्षी बदलते. त्यानुसार स्वत:ला सतत अपडेट ठेवणे, लेटेस्ट डिझाईन्स शिकणे आणि ते कार्डवर अचूकपणे लागू करणे महत्वाचे आहे. Business Idea
अशा प्रकारे मिळेल चांगला नफा
कार्ड प्रिंटिंगचा व्यवसायाद्वारे कमी खर्चातही चांगला नफा मिळवता येतो. समजा, एका सामान्य कार्डची किंमत 10 रुपये असेल. मात्र कार्डचा दर्जा आणि डिझाइन जसजसे चांगले होत जाते, तसतशी त्याची किंमत वाढ जाते. प्रत्येक लग्नामध्ये किमान 500 ते 1000 कार्ड नक्कीच छापले जातात. अशा परिस्थितीत, जर आपण अगदी 10 रुपयांचे कार्ड प्रिंट करत असाल, तर त्याचा संपूर्ण खर्च वजा करून 3 ते 5 रुपयांपर्यंतची बचत होते. तसेच जर दुसरीकडे, जर कार्डला आणखी चांगली किंमत मिळाली तर ही बचत 10 ते 15 रुपयांपर्यंत होऊ शकेल. अशा परिस्थितीत, लग्न सराईमध्ये हा व्यवसाय सुरू करून चांगला नफा कमवता येईल. Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा