Bussiness Idea | आजकाल अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु अनेक जणांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. ज्यामध्ये भरपूर कमाई होईल परंतु भांडवल मात्र कमी लागेल. परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. त्यात तुम्ही केवळ 5 हजार रुपये गुंतवणूक करून बिजनेस करू शकता. आणि खूप चांगला व्यवसाय देखील करू शकतात हा व्यवसाय आहे चहा पावडरचा व्यवसाय.
आपल्या देशात सर्व चहाचा शॉकिंग असा वर्ग आहे. काही काही लोकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधीही चहा चालतो. त्यामुळे या व्यवसायातून खूप चांगले उत्पन्न मिळते. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण चहा पावडरचे हे उत्पादन वापरतो. आपल्या देशात अनेक भागांमध्ये चहाच्या पानांची लागवड केली जाते. त्यात आसाम आणि दार्जिलिंगमध्ये चहाची पाने खूप चांगल्या प्रकारे तयार होतात. त्याची मागणी परदेशातही आहे. तर आपण आता या चहा पावडरचा व्यवसायाचा इतर माहिती लक्षात घेऊया.
चहा पावडरचा व्यवसाय कसा करायचा | Bussiness Idea
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही बाजारात अगदी सैल चहा पावडर देखील विकू शकता. किंवा चहाच्या पानांचा किरकोळ आणि घाऊक व्यापार देखील करू शकता. अशा अनेक कंपन्या आहेत. ज्या आपला चहापावडर विकण्यासाठी फ्रेंचाईची कार्यक्रम चालवतात. ही फ्रेंचायजी अतिशय कमी बजेटमध्ये देखील तुम्हाला मिळते. आणि विक्रीवर देखील चांगले कमिशन मिळते. त्यातील आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही अगदी घरोघरी जाऊन देखील तुमचे पॅक विकू शकता.
दर महिन्याला किती कमाई होईल
चहा पावडरचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आसाम आणि दार्जिलिंगमधील चहा पावडरचा भाव १४० ते १८० रुपये प्रति किलो दराने विकला जातो. तुम्ही बाजारात 200 ते 300 रुपये दराने हा चहा विकू शकता. फक्त पाच हजार रुपयांपासून तुम्हाला ही सुरुवात करावी लागेल आणि तुम्ही दर महिन्याला जवळपास 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम सहज कमावू शकता. तुम्हाला जर तुमच्या चहाचा ब्रँड बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची कंपनी रजिस्टर करावी लागेल आणि चांगल्या दर्जाचे पॅकिंगही करावे लागेल.