हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OLA : प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. मात्र, काही वेळा पैसे नसल्यामुळे म्हणा किंवा काही वेळा व्यसायाची योग्य कल्पना नसल्यामुळे म्हणा अनेकांना तो करता येत नाही. आज आपण घर बसल्या करता येऊ शकणाऱ्या एका व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यवसायात अगदी थोड्याशा गुंतवणूकीद्वारे आपल्याला दर महिन्याला चांगले देखील पैसे मिळू शकतील. जर तुम्हाला ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये रस असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकेल. यामध्ये तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करून आणि ती भाड्याने देऊन मोठी कमाई करता येईल. OLA सोबत हा व्यवसाय सुरू करून दरमहा किमान 50 हजार रुपये सहजपणे कमवता येतील.
हे जाणून घ्या कि, OLA कडून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फ्लीट अटॅच करण्याची म्हणजेच एकाच वेळी अनेक कार जोडण्याची सुविधा दिली जात आहे. याद्वारे 2-3 गाड्यांव्यतिरिक्त अनेक गाड्या जोडून व्यवसाय सुरु करता येईल. तसेच तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार गाड्यांची संख्या देखील वाढवता येईल. तसेच यासाठी कोणतीही मर्यादा नसेल. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे जितक्या जास्त कार असतील तितकी जास्त तुमची कमाई होईल.
‘ही’ कागदपत्रे द्यावी लागतील
मात्र हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यासाठी पॅन कार्ड, कॅन्सल चेक, आधार कार्ड, घराचा पत्ता द्यावा लागेल. याशिवाय, कारची कागदपत्रे जसे की वाहनाचे आरसी, वाहनाचे परमिट, कार इन्शुरन्स या सर्वांची आवश्यकता असेल. त्याचबरोबर चालकाच्या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घराचा पत्ता असणे आवश्यक आहे.
OLA कडून लहान व्यवसाय स्टार्ट-अपसाठी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिली जात आहे. आता तुम्ही एकाच ऍप्लिकेशनवरून तुमच्या प्रत्येक टॅक्सीचे पैसे आणि परफॉर्मन्स तपासू शकाल. ओलाने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. यासाठी https://partners.olacabs.com/attach ला भेट द्यावी लागेल.
प्रत्येक कारद्वारे मिळू शकेल 40 ते 50 हजार रुपयांचा नफा
यासाठी OLA च्या ड्रायव्हर पार्टनर्स प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हावे लागेल. ओला कडून बऱ्याच दिवसांपासून हा कार्यक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत एका कारद्वारे होणार सर्व खर्च वजा करून दरमहा 40,000 ते 45,000 रुपये मिळतील. यामध्ये तुमच्याकडे असलेल्या कारच्या संख्येनुसार एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल. मात्र यातून तुम्हाला चालकाचा पगार द्यावा लागेल.
OLA मध्ये कसे सामील व्हावे ???
OLA च्या ड्रायव्हर पार्टनर्स प्रोग्रॅममध्ये सामील होण्यासाठी त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचे कमर्शियल डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवस लागू शकतील.
कंपनीकडून बोनस देखील मिळेल
दिवसभरात जेव्हा वाहनांना जास्त मागणी असते, त्या वेळी बुकिंग केल्यास त्यावर 200 रुपयांपर्यंतचा बोनस मिळतो. जर एका दिवसात 12 राइड पूर्ण झाल्या तर कंपनीकडून निश्चित बोनस अंतर्गत तुम्हाला 800 ते 850 रुपये अतिरिक्त मिळतील. इथे हे लक्षात घ्या कि, बोनसमध्ये मिळणारी रक्कम वेळोवेळी बदलत असते.
हे पण वाचा :
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
Indusind Bank ने वाढवले FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!
Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले