Saturday, January 28, 2023

फक्त 210 रुपये जमा करून दर महिन्याला मिळणार 5000 रुपये पेन्शन! अटल पेन्शन योजनेचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | कमी गुंतवणुकीमध्ये पेन्शनच्या गॅरंटीसाठी ‘अटल पेन्शन योजना’ ही एक चांगला विकल्प आहे. सध्या अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत सरकार 1 हजार ते 5 हजार रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. सोबतच, 40 वर्षापर्यंतच्या वयापर्यंत एखादी व्यक्ती या योजनेकरीता अर्ज करू शकते. आपणही या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपले आयुष्य पेन्शनच्या माध्यमातून सुरक्षित करू इच्छित असाल तर, ही माहिती तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊ, कशा पद्धतीने अटल पेन्शन योजनेचा फायदा आपण घेऊ शकता याविषयी.

अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट हे देशातील सर्वांना पेन्शन प्राप्त करून देणे हा आहे. यामुळे पेन्शन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) ने सरकारकडे अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत वयाची मर्यादा वाढविण्याची विनंती केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार सहा महिन्यासाठी फक्त 1239 रुपये गुंतवणूक केल्यास, 60 वर्षानंतर आजीवन पाच हजार रुपये महिना अथवा 60 हजार रुपये वार्षिक पेन्शन ची गॅरंटी देते. जर आपण 35 वर्षी या योजनेमध्ये जोडले जात असाल तर, 25 वर्ष आपणाला सहा महिन्याला 5323 रुपये जमा करावे लागतील. यामध्ये आपल्याला 2 लाख 66 हजार रुपये हे 25 वर्षापर्यंत जमा करावे लागतील. त्यानंतर महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकणार आहे. हीच रक्कम आपण अठराव्या वर्षापासून भरत असाल तर, आपली संपूर्ण रक्कम ही 1 लाख रुपये होईल. म्हणजेच एकाच पेन्शनसाठी उशिरा जोडले गेल्यास, 1 लाख 60 हजार रुपये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे.

- Advertisement -

या पेन्शन योजनेमध्ये आपण तीन पद्धतीने गुंतवणूक प्लॅन निवडू शकता. महिना, तिमाही अथवा सहा महिन्याला गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. या योजनेमध्ये आपणाला गुंतवणुक 42 वर्षापर्यंत करावी लागणार आहे. यानंतर, साठ वर्षानंतर आपणाला आजीवन महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन योजना ‘राष्ट्रीय पेन्शन’योजने अंतर्गत, ‘पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण’ संचलित करते. या योजनेतील गुंतवणूकदाराला इन्कम टॅक्स सेक्शन 80ccd मार्फत टॅक्समध्ये सूट मिळते. एका सदस्याच्या नावाने एक अकाउंट उघडता येईल. सुरुवातीच्या पाच वर्षासाठी सरकारकडूनही योगदान राशी दिली जाणार आहे. 60 वर्षानंतर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ही पेन्शन मिळू शकेल. गुंतवणूकदार आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यास सरकार नोमिनीला पेन्शन देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.