मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा; भायखळा रेल्वे स्थानकाला जागतिक पातळीवर UNESCO’चा पुरस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबईला विविध अंगाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. असाच १६९ वर्षांचा इतिहास मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकाला देखील लाभलेला आहे आणि याची दाखल युनेस्कोने घेतली आहे. मुंबईतील अत्यंत जुने आणि गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे  ‘भायखळा रेल्वे स्थानक’  आता सन्मानित केले जाणार आहे. नुकताच युनेस्कोने ‘आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर’ केला असून हा पुरस्कार भायखळा रेल्वे स्थानकाला देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक हे तब्बल १६९ वर्षे जुने आहे. या स्थानकाचा कायापालट होत राहिला मात्र इतिहास जपून. या रेल्वे स्थानकाचे नवे रुप पाहून तर जणू आपण मागील काळात गेलो आहोत का काय..? असाच काहीसा भास होतो. भारतातील गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून ‘भायखळा’ हे रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे. गेली तीन वर्ष या स्थानकाच्या पुनर्संचयनाचे काम सुरु होते. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या रेलवे स्थानकाचे काम पूर्ण केल्यानंतर वास्तूतील भिंत अन भिंत लक्षवेधी ठरते आहे.

अत्यंत दर्जात्मक पद्धतीने या रेलवे स्थानकाचे काम केल्याने युनेस्कोचा ‘आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार’ भायखळा स्थानकाला प्राप्त झाला आहे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज या ट्विटर हॅण्डलवरून या पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, भायखळा रेल्वे स्थानकाचे संपूर्ण काम ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने केले आहे. तर भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्त्वात तसेच बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले आहे.