हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी २०२४ लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र भाजप (BJP) आणि शिंदे गटासाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तब्बल ३४ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या पोटात गोळा आणणारा हा सर्वे ठरला आहे.
इंडिया डुटे- C वोटरच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्यांमध्ये NDA ला मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रात तर एकूण ४८ लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल ३४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या १४ जागांवर समाधान मानावे लागेल. त्यामुळे शिंदे गटाचा भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता सर्वेक्षणानुसार दिसत आहे.
2024 ला देशात कोणाचं सरकार येणार?? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/i87ibpgnE4#Hellomaharashtra @BJP4India
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) January 27, 2023
२०१९ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र्रात शिवसेनेला १८, राष्ट्रवादी काँग्रेस ५ आणि काँग्रेसला फक्त १ जागा जिंकता आली होती. तर भाजपला तब्बल २३ जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी भाजप शिवसेना युती होती. आता मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सामील झाली आहे तर शिंदे गट आणि भाजप एकत्र आहे. सध्या राज्यात शिंदे फडणवीस सरकार आहे आणि राज्यातील एकूण राजकीय स्थिती भाजपला अनुकूल आहे तरीही २०२४ निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील हा इंडिया डुटे- C वोटरचा सर्वे नक्कीच महाराष्ट्र भाजपची झोप उडवणारा ठरला आहे.