व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

2024 ला देशात कोणाचं सरकार येणार?? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भाजप आणि देशभरातील अन्य विरोधी पक्ष असाच सामना 2024 ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, जर आत्ताच निवडणुका पार पडल्या तर भाजप आपली सत्ता राखेल का? की काँग्रेस मुसंडी मारत पुन्हा एकदा देशात आपलं सरकार आणेल याबाबत इंडिया टुडे-सी व्होटरने सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुका झाल्या तर देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार परत येण्याची शक्यता वर्तवली आहे.

इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला 543 पैकी तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील. अन्य पक्षांना 92 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणानुसार, एनडीएला जवळपास 43 टक्के मते मिळू शकतात. तर यूपीएला 29 टक्के आणि अन्य पक्षांना 28 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया डुटे-C वोटरच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्यांमध्ये NDA ला मोठा फटका बसू शकतो. महाराष्ट्रात तर एकूण 48 लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागांवर समाधान मानावे लागेल. C वोटरचा हा सर्वे नक्कीच महाराष्ट्र भाजपची झोप उडवणारा आहे.