हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु करीत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडून यात्रेच्या माध्यमातून कोकण वासियांचे आशीर्वादही घेतले जात आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये यात्रेदरम्यान त्यांना शॉक लागण्याची घटना घडली. सुद्यवाने यामध्ये कोणता अनुचित प्रकार घडला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅबिनेटमंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची यात्रा कणकवलीमध्ये पोहचल्यानंतर मंत्री राणे हे व्यासपीठावर जात असताना त्यांना शॉक लागला. त्यांचा तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागला. यामध्ये सुदैवाने ते बचावले.
यावेळी व्यासपीठावर ते पोहचल्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. “मला भरपूर प्रेम दिलात मी इतपर्यंत पोहचलो ते सिंधुदुर्गातील जनतेच्या आर्शिवादामुळे, वारंवार मी पाहतोय मुंबई पासून एक वाक्य कानावर येतेय राणे साहेब आगे बढो! हम तुम्हारे साथ है!आता मी दिल्लीला पोहचलो आता कुठे जायचे सांगा. मोदीच्या मंत्रिमंडळात गेलो हे शेवटचे पद असल्याचे राणे यांनी म्हंटले.