शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे?

0
163
Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे – फडणवीस या नव्या सरकारकडून लवकरच खातेवाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात खातेवाटपाबाबतशिंदे- फडणवीसांनी निर्णय घेतला असून त्यामध्ये 28 खाती ही भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार आहेत. ठाकरे सरकारमधील तब्बल 8 मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेली आहे.

नुकतीच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी खाते वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदा व जलसंधारण, उद्योग हि पदे ठेवण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा फडणवीस व शिंदे यांच्यात बैठक होणार आहे.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी  दोन्ही पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. तर उर्वरित विस्तार हा राष्ट्रपती निवडणुकीच्या नंतर केला जाईल. शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. खातेवाटबाबत एकमत झाले असले तरीही शिंदे गटातील 40 आमदारांपैकी कोणत्या कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान आज सायंकाळी खातेवाटपाबाबत बैठक घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here