हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्तात सोने विकत घेण्याची संधी दिली जात आहे. सरकारकडून नुकताच Sovereign Gold Bonds चा दुसरा हप्ता जारी करण्यात आलेला आहे. याअंतर्गत आता 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे गोल्ड बाँड्स खरेदी करता येतील. या गोल्ड बाँड्सची किंमत 1 ग्रॅम साठी 5197 रुपये निश्तिच करण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन पेमेंट केल्यास यावर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देखील दिली जाईल. मात्र 26 ऑगस्टपर्यंतच ही योजना सुरु राहणार आहे.
हे लक्षात घ्या कि, ट्रस्ट किंवा त्यांच्यासारख्या इतर संस्थाना देखील हे गोल्ड बाँड्स खरेदी करता येतील. मात्र त्यासाठी 20 किलोपर्यंतचे लिमिट असेल. यामध्ये गुंतवणूक करण्याआधी Sovereign Gold Bonds विषयी जाणून घेउयात. तसेच ते गहाण ठेवून यावर कर्ज मिळू शकेल का ??? हे देखील जाणून घेउयात…
Sovereign Gold Bonds म्हणजे काय???
हे डिजिटल गोल्ड आहे ज्यामध्ये गुंतवणूक करता येते. यामध्ये डिजिटल पद्धतीने सोन्याचे युनिट दिले जातात. 2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश बाजारातील फिजिकल गोल्डकडील लोकांचा कल कमी करणे हा होता. हे जाणून घ्या कि, RBI कडून सरकारच्या वतीने हे गोल्ड बॉण्ड्स जारी केले जातात.
यावर कर्ज मिळू शकेल का ???
होय, फिजिकल गोल्डप्रमाणेच Sovereign Gold Bonds देखील गहाण ठेवून कर्ज मिळू शकेल. बँका, वित्तीय संस्था किंवा गैर-वित्तीय संस्थांकडून हे कर्ज दिले जाईल. मात्र हे लक्षात घ्या कि, यासाठी प्रत्येक वित्तीय संस्थेची स्वतःची कर्ज मर्यादा असते. उदाहरणार्थ, SBI कडून गोल्ड बाँड्सवर कमीत कमी 20,000 रुपये तर जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल तर पीएनबी 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल. तसेच कर्जाशी संबंधित इतर शुल्क देखील संबंधित वित्तीय संस्थांवर अवलंबून असतील. यामध्ये सरासरी 10-12 टक्के दराने व्याज दिले जाईल.
कर्ज कसे मिळेल ???
हे कर्ज घेण्यासाठी बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. तसेच Sovereign Gold Bonds वर कर्ज घेण्यासाठी डिमॅट खाते असावे लागेल. मात्र यासाठी कमी व्याजदर असलेल्या बँकेची निवड करा.
गोल्ड बॉण्ड्स कुठे मिळतील ???
हे Sovereign Gold Bonds आपल्याला स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्स्चेंज येथून खरेदी करता येतील. मात्र ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकेकडून खरेदी खरेदी करता येणार नाहीत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, आजचे नवे दर तपासा
‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!
Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!
Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!
Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार