75 वर्षीय आजोबांच्या शीर्षासनाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीराची काम करण्याची क्षमता कमी होते. मात्र काही लोक याला अपवाद असतात. वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी ते एकदम फिट असतात. सध्या अशाच एका आजोबाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचा फिटनेस पाहता तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल. शीर्षासन करत असलेल्या एका 75 वर्षीय व्यक्तीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हि व्यक्ती वयाच्या 75व्या वर्षी शीर्षासन (Headstand) करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CdbDD4VIUs7/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

कॅनडातील ड्यूक्स-मॉन्टॅग्नेस येथे राहणारा टोनी हेलो यांचा हा व्हीडिओ आहे. अशी कामगिरी करणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्यांच्या या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या व्हीडिओमध्ये टोनी हेडस्टँडसाठी (Headstand) तयार असताना दिसत आहे. विशेष म्हणजे टोनी हॅलो यांनी 16 ऑक्टोबर 2021 ला वयाची 75 वर्षे आणि 33 दिवसांमध्ये हा विक्रम केला आहे.

हा व्हीडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘हेडस्टँड करण्यासाठी सर्वात वयस्कर व्यक्ती: 75 वर्षीय टोनी हॅलो’, असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये नावाची नोंद झाल्यानंतर टोनीने “मला माझ्या कुटुंबाकडून ही कृती हा रेकॉर्ड करण्याची प्रेरणा मिळाली होती. परंतु कोणत्याही वयात महान गोष्टी साध्य करणं, शक्य आहे हे देखील सिद्ध करायचं होतं. मी वयाच्या 55 व्या वर्षी फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरू केलं. दररोज धावणे, पुशअप्स आणि हेडस्टँड्स करून फिट राहण्यासाठी प्रयत्न सुरी केले. मी एकदा या कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवलं, की मग मी हेडस्टँडचा (Headstand) सराव सुरू केला. घरी, उद्यानात आणि कुटुंब आणि मित्रांसमोर सगळीकडे मी याचा सराव केला. अन् आता त्याचं फळ मला मिळालंय” अशी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा :

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!!

Home Loan : आता घर खरेदी करणे महागणार, LIC हाउसिंग फायनान्सकडून होम लोनवरील व्याजदरात वाढ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा वाढविली; आता ‘या’ दर्जाची पुरवली जाणार सुरक्षा

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आमिरच्या मुलाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पडद्यामागे नव्हे तर पडद्यावर झळकणार ‘जुनैद’

Leave a Comment