हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. तसेच, आधीच ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे त्यांचा EMI देखील वाढणार आहे. Canara Bank ने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेट मध्ये (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बहुतेक बँकांनी आपला MCLR दर वाढवला आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, हे वाढीव दर बुधवारपासून लागू होणार असल्याचे Canara Bank कडून आपल्या नियामक फाइलिंगमध्ये सांगितले गेले आहे. ज्यामुळे आता एक वर्षासाठीचा बेंचमार्क MCLR दर 7.75 टक्के असेल. जो आतापर्यंत 7.65 टक्के होता. या वाढीमुळे आता कंज्यूमर लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन आणि होम लोन महागणार आहेत.
रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम
Canara Bank कडून ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या MCLR दरात 0.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, Canara Bank कडून 3 महिन्यांचा MCLR दरातही 15 बेसिस पॉइंट्सची वाढ करून 7.25 टक्के करण्यात आला आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यापासून जवळपास सर्वच बँकाकडून आपले व्याजदर वाढवले जात आहेत. हे जाणून घ्या कि, 2022 मध्ये RBI ने रेपो रेटमध्ये 3 वेळा वाढ केली आहे. ज्यामुळे आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे.
PNB ने देखील MCLR मध्ये केली वाढ
पंजाब नॅशनल बँक (PNB) ने देखील 1 सप्टेंबर रोजी MCLR दर वाढवण्याची घोषणा केली होती. यावेळी PNB ने कर्जावरील दरात 5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. PNB चा ओव्हरनाईट बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट 7.00 टक्क्यांवरून 7.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
ICICI बँकेकडून कर्ज घेणे महागले
ICICI ने देखील 1 सप्टेंबर 2022 पासून MCLR दरात वाढ केली आहे. यावेळी बँकेने MCLR चे दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले आहेत. ज्यामुळे बँकेचा ओव्हरनाईट MCLR दर आता 7.65 टक्के झाला आहे. त्याच वेळी, एक महिन्याचा दर 7.75 टक्के झाला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://canarabank.com/User_page.aspx?othlink=13
हे पण वाचा :
IRCTC : ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना जेवणासहित ‘या’ सुविधा मिळतात मोफत !!!
Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!
गेल्या 23 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन दर तपासा
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!