बोर्ड परीक्षा रद्द करा, म्हणत सोनू सूदने सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. सध्या विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा रद्द करावी किंवा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित करण्याची मागणी होत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं देखील विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. देशात 1 लाख 45 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना प्रमोट करावं, असं ट्विट सोनू सदूनं केलं आहे.

“सर्वांना मी आवाहन करतो की जे विद्यार्थी बोर्डाच्या ऑफलाईन पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाणार आहेत त्यांच्या पाठिशी राहा, असं सोनू सूद म्हणाला.देशात सध्या 1 लाख 45 हजार रुग्ण प्रत्येक दिवशी वाढत आहेत, अशा वेळी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे त्यांना प्रमोट करावं, त्यांच्या जीव संकटात घालू नये,” असं सोनू सूद म्हणाला. सोनू सूदनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनू सूदचं ट्विट…

 

अभिनेता सोनू सूद यानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं ऑफलाईन परीक्षा आयोजित करण्यास विरोध केला आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मार्ग काढला पाहिजे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे प्रमोट करावं, असंही तो म्हणाला. देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबद्दल त्यानं काळजी व्यक्त केली. सोनू सूदनं याविषयी बोलताना सौदी अरेबियामध्ये केवळ 600 विद्यार्थी असताना त्यांनी परीक्षा रद्द केली. मेक्सिकोमध्ये 1300 आणि कुवेतमध्ये 1500 रुग्ण असूनही त्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतात 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. आता तरी सरकारनं विद्यार्थ्यांची समस्या गांभीर्यानं समजून घ्यावी, असं सोनू सूद म्हणाला.

सध्या वाढलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन पद्धतीनं घ्या, असी मागणी केली आहे. मात्र, सीबीएसईनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कराव्यात यासाठी मागणी करण्यात येत आहे. सीबीएसईच्या लेखी परीक्षांना 4 मेपासून सुरुवात होणार आहे.

You might also like