हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी काळात भारतात कॅन्सरचे (Cancer) प्रमाण वाढणार असल्याचा इशारा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिला आहे. ICMR च्या मते, 2025 पर्यंत या प्रकरणांमध्ये 12.7 टक्के वाढ होऊ शकते. धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान, लठ्ठपणा, पोषक तत्वांचा अभाव ही कॅन्सरची मुख्य कारणे आहेत.
खरं तर गेल्या काही वर्षांत देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याकडेच लक्ष्य वेधत ICMRशी संबंधित तज्ञांनी हा इशारा दिला आहे. आकडेवारीनुसार, 2020 मध्ये जवळपास 14 लाख लोकांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यानंतर तोच आकडा 2021 मध्ये 14.26 लाख आणि 2022 मध्ये 14.61 लाखांवर पोचला. हृदयविकारापेक्षा कॅन्सर असलेल्या लोकांचे प्रमाण भारतात जास्त आहे. वरील आकडेवारी नक्कीच चिंतेची बाब आहे.
भारतात कॅन्सरची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक प्रमाण हे पुरुषांमध्ये असल्याचे दिसते. जवळपास पुरुषांना तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होत आहे. तर स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्यांना स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरवर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाचा जीव वाचवणं सुद्धा कठीण होऊन बसते. त्यामुळे पुरुषांनी कॅन्सर न होण्यासाठी तंबाखू आणि दारूचे सेवन टाळणे आवश्यक आहे. तसेच कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे,