Wednesday, February 1, 2023

‘या’ महत्त्वाच्या कारणामुळे विराट कोहली पहिल्या कसोटीनंतरच मायदेशी परतणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. त्याला बीसीसीआयने मंजुरी दिली असून त्यामुळे कोहली तीन कसोटीला मुकणार आहे. बीसीसीआयनं येत्या रविवारी त्या संदर्भात तातडीची बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार रोहित शर्माचा कसोटी मालिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

26 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत कर्णधार कोहलीनं अॅडलेड कसोटीनंतर मायदेशात परतण्याचे निवड समितीला सांगितले होते. बीसीसीआयनं त्याची पितृत्व रजा मान्य केली आहे. त्यामुळे 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पहिल्या कसोटीनंतर कोहली मायदेशात परतणार आहे. अनुष्का प्रेग्नेंट असून जानेवारीत बाळ होणार असल्याचे या दोघांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे पहिल्या बाळाच्या जन्मासाठी कोहली अनुष्कासोबतच राहणार आहे.

- Advertisement -

 

दरम्यान, रोहित शर्माच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच त्याला वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय झाला असून कसोटी संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. वन डे संघात संजू सॅमसन याची अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. इशांत शर्मा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे आणि पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात येईल, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’