भरधाव कारने वाटेत येणाऱ्या लोकांना उडवले, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहिले असेल. काही अपघातात (accident) हृदय पिळवटून टाकणारे असतात. तर काही अपघात (accident) हे विचित्र असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा एक अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधला हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये एका कारने अगदी काही क्षणभरातच अनेकांना धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने एका स्कूटरसह तीन जणांना कारची धडक बसते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जाऊन ही कार धडकते.ही घटना डोंबिवलीतील पाथर्डी परिसरातील असल्याचे समोर आले आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या अपघातात (accident) तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द; अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती
‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये