SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग सीजीएल (SSC CGL Recruitment 2022) अंतर्गत काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 8 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

आयोग – कर्मचारी निवड आयोग सीजीएल (Staff Selection Commission Combined Graduate Level)

भरली जाणारी पदे –

सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022

मिळणारे वेतन – 76,000/- ते 1,51,100/- दरमहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असावं.

संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया –

टियर-I: संगणक आधारित परीक्षा.

टियर-II: संगणक आधारित परीक्षा.

टियर-III: पेन आणि पेपर मोड (वर्णनात्मक पेपर).

टियर-IV: संगणक प्रवीणता चाचणी/ डेटा एंट्री कौशल्य चाचणी.

आवश्यक कागदपत्रे –

Resume
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.