विमानाला ट्रकची धडक!! मुंबईत घडली दुर्घटना

mumbai airport akasa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक विचित्र घटना घडली आहे. आज सोमवारी दुपारी मुंबई विमानतळावर उभ्या असलेल्या अकासा विमानाला एका मालवाहतूक ट्रकने धडक दिली. या धडकेत विमानाच्या पंखाचे थोडेफार नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही . सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती अकासा एअरच्या प्रवक्त्याने सांगितले.

नेमकं काय घडलं?

अकासा कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, सदर विमान हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. त्याच वेळी एक मालवाहतूक करणारा ट्र्क विमानाच्या संपर्कात आला. आणि विमानाला धडक दिली. या धडकेत कर्मचाऱ्यांना किंवा प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे विमानाचे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, घटनास्थळावरील एका फोटोमध्ये विमानाचा एक पंख ट्रकमधून किंचित बाहेर पडल्याचे दिसून येते. म्हणजेच थोडं का होईना पण विमानाला फटका बसला आहे.

दरम्यान, भारतीय विमानतळांवर जमिनीवरील अपघातांमध्ये वाढ रोखण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले जात आहेत. डीजीसीएने सहा वर्षांपूर्वी असे आदेश दिले होते की ऑपरेटर्सना वाहने चालविण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि चालकांना एअरसाइड ड्रायव्हिंग नियमांचे आवश्यक ज्ञान आहे याची खात्री करावी लागेल. २०१९ मध्ये जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे: “विमानतळांवर होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी, डीजीसीएने विमानतळाच्या हवाई मार्गावरील सुरक्षा मानकांचे बेंचमार्क करण्यासाठी एक तपशीलवार चेकलिस्ट विकसित केली आहे… मात्र मागच्या महिन्यातील अहमदाबाद विमान अपघानंतर अनेकदा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं… काही उड्डाणे रद्द झाली… विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड दिसत असल्याने विमान प्रवाशी चिंतेत आहेत.