हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे या अधिकाऱ्यावर रात्रीच्यावेळी घरात घुसून महिलेची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलिसांत संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून नाईट ड्युटीवर असताना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याच्या आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे. औरंगाबादचे पोलीस अधिकारी विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र, याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी विनंती ढुमे यांनी आपल्या मित्राकडे केली. त्यामुळे मित्राने देखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले.
ज्यावेळी तिघेजण गाडीत बसण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या मित्र आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागच्या सीटवर बसले होते. दरम्यान, गाडीत बसताच दारूच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी गाडीतच महिलेची छेड काढायला सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली.
त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी पुन्हा मित्राला विनंती केली. तर घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, असे म्हणत ढुमे याने वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. पण तिथेही महिलेची छेड काढली. याप्रकरणी संबंधित महिला व तिच्या पतीने छेडछाड आणि मारहाण प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दिली आहे.