लॉकडाउनच्या काळात वाढलं कॅश विड्रॉलच प्रमाण; जाणून घ्या भारतीयांच्या हातात किती रोख रक्कम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशात जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत आपातकालीन परिस्थितीत अडचण येऊ नये म्हणून नागरिकांनी बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. १३ मार्च रोजी संपलेल्या पंधरवड्यात लोकांनी बँकांमधून विक्रमी ५३ हजार कोटी रुपये काढले आहेत. मागील १६ महिन्यांमधील ही विक्रमी रक्कम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. साधारणत: फक्त सण-उत्सव किंवा निवडणुकांच्या काळात मोठ्या प्रमाणात बँकांमधून पैसे काढले जातात. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च पर्यंत एकूण २३ लाख कोटी रुपये सामान्य लोकांच्या हाती होते.

का? वाढलं कॅश विड्रॉलच प्रमाण
अर्थतज्ञाच्या मते आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ म्हणून प्रथमदर्शी कॅश विड्रॉलच प्रमाण वाढल्याचं दिसत. बँका जरूर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असतील मात्र, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाइटने त्यांच्या सेवा बंद केल्या आहेत. अशा परिस्थितीत बाजारातील बहुतेक लोक रोकड वापरण्याला प्राधान्य देत आहेत. म्हणूनच रोख रकमेचे व्यवहार वाढले आहेत.

कॅश विड्रॉलचा परिणाम काय होऊ शकतो?
तथापि, बँकांकडून एवढी मोठी रक्कम काढून घेण्यात आल्यामुळे बँक ठेवींवरही परिणाम होईल. वित्तीय बाजारात चढ-उतारा वेळी बाजारातील लिक्विडिटीवर याचा परिणाम होऊ शकतो. काही तज्ञांना असा विश्वास आहे की येत्या काळात रोख रक्कम काढणे कमी होईल.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment