व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

संकटाशी लढण्याचा क्युबा पॅटर्न महासत्ता देशांनाही कसा धडा शिकवतोय ??

मागील आठवडाभरात क्युबा या देशाचं नाव अनेकांच्या नजरेत आलं. क्युबाच्या डॉक्टरांनी काहीतरी मदत केली वगैरे वगैरे..नक्की काय ते बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. कम्युनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाने काही काळ आधी महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही झुकायला भाग पाडलं होतं. आताचं प्रकरण नेमकं काय होतं? याचा थोडक्यात आढावा वाचा या लेखात..!!

लढा कोरोनाशी | एम.एस. ब्रामर हे अटलांटिक महासागरापलीकडील समुद्र पर्यटनाचे जहाज जे युनायटेड किंगडम मधून ६८२ प्रवाशांना घेऊन निघाले होते, ते त्याच ठिकाणी थांबविण्यात आले आहे. या जहाजातील ५ प्रवाशांची कोरोना विषाणूची तपासणी सकारात्मक आली होती. कित्येक डझन प्रवाशी आणि जहाजातील सदस्य त्यांच्यामध्ये तापासारखी लक्षणे आढळून आल्याने वेगळे राहिले होते. कॅरिबियनच्या अनेक बंदरामधून या जहाजाने प्रवास केला होता. ब्रिटिश सरकारमध्ये असलेल्या सूत्रांनी सीएनएनशी बोलताना सांगितले, “ही माहिती मिळताच ‘ब्रामर’ला योग्य बंदर मिळवून देण्यासाठी यु.के सरकारने युनायटेड स्टेट्स आणि क्युबा या दोन्ही राष्ट्रांशी संपर्क साधला.
जर ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या ‘चीनी विषाणूला’ आणि जगभरातील परदेशी नागरिकांना दूर ठेवण्याच्या  वक्तव्याकडे काळजीपूर्वक पाहिल्यास आपल्याला अंदाज येऊ शकेल की, कुणी या जहाजाला जागा दिली? आणि तसेही या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टरांना पाठविणाऱ्या क्युबाच्या  परोपकारी परंपरेबद्दल आपल्याला माहीती आहेच, त्यामुळेच आपण अंदाज लावू शकतो.

गेल्या बुधवारी ब्रामरला क्युबामधील मॅरिएलच्या बंदरात आणले गेले. जे प्रवासी प्रवास करण्यास निरोगी होते अशा प्रवाशांना हवाना विमानतळावर पोहचविण्यात आले. जे १० प्रवासी प्रवास करण्यास अक्षम होते, अशांना आणि जहाजातील रुग्णांना इथे ठेवल्यास रुग्ण वाढण्याची शक्यता आहे अशी धमकी देऊनही क्युबाच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. क्युबा या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी पुढे आला. क्युबा हा गरीब देश असून बऱ्याचदा त्यांना टंचाईचा सामना करावा लागतो. ६० वर्षे नैसर्गिक व्यापार भागीदारीमुळे क्युबा आर्थिक नुकसान भोगत आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेत बऱ्याच संरचनात्मक त्रुटी आहेत. पण असे असूनही, कोरोना विषाणू हा साथीचा आजार जगभर पसरलेला असताना क्युबा चांगलं काम करत आहे. या देशाने वैद्यकीय व्यवस्था पूर्णतः  समाजीकृत केली आहे.

ही व्यवस्था जैविक तंत्रज्ञानातील सृजनात्मकसोबत लोकांच्या आरोग्याचीही हमी देते. आपल्या देशामध्ये आणि चीनमध्ये कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी क्यूबाच्याच औषधांचा (इंटरफेरॉन अल्फा- २ बी) वापर केला जात आहे. तसेच क्युबामध्ये दरडोई (दरहजारी) ८. २ डॉक्टरांची वाढ करण्यात अली आहे. हे प्रमाण युनायटेड स्टेट्स (२.६), दक्षिण कोरिया (२.४) यांच्या तिप्पट, चीनच्या (१.८) पाचपट आणि इटलीच्या (४.१) दुप्पट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थेच्या जोरावर क्युबाने इतर गरीब देशांच्या आणि काही श्रीमंत देशाच्याही तुलनेत देशातील नागरिकांना आपत्कालीन संरक्षण देण्याचा एक उत्तम रेकॉर्ड आहे.

त्यांची सर्वोच्च आणि सर्वसमावेशक चक्रीवादळ सज्जता प्रणाली म्हणजे एक चमत्कारच आहे. त्यांचे आकडे हेच सांगतात. २०१६ मध्ये आलेल्या मॅथ्यु चक्रीवादळाने डझनाने अमेरिकी आणि शेकडो हैतीवासी मृत्युमुखी पडले पण क्युबाच्या एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. इथले नागरिक बाहेर पडताना त्यांच्यासोबत त्यांच्या पाळीव प्राण्यांना नेण्यासही सक्षम होते. त्यांच्या निर्वासन केंद्रावर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही तैनात केले होते. कोरोना विषाणूचं आव्हान चक्रीवादळापेक्षा नक्कीच कठीण असणार आहे, पण पुन्हा क्युबा त्यांची सर्वसमावेशक प्रणाली वापरत या आव्हानासाठी तयारी करत आहे. कसं?

पर्यटनावर बंदी – क्युबामधील पर्यटन बंद करण्यात आले आहे. (विशेषतः अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या व्यवसायाचा त्याग करून) आणि राष्ट्रीयकृत आरोग्य सेवा विभागाने सर्व नागरी रुग्णालयांसोबत अनेक सैन्य रुग्णालयेही नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. 

मास्क : दोन देशांची कथा – युनायटेड स्टेट्समध्ये सर्जन जनरल आणि यंत्रणेने वैद्यकीय क्षेत्रांतील लोकांसाठी मास्क शिल्लक ठेवण्यासाठी म्हणून नागरिकांना सांगितले की, मास्कचा काहीच उपयोग होणार नाही. नुकत्याच न्यूयॉर्क टाइम्समध्ये डॉ झेनेफ तुफेकी यांनी डॉक्टर आणि नर्सेसना मास्क लागतील असा दावा करत हे करणं खूप कुचकामी असल्याचा दावा करत युक्तिवाद केला. त्यांनी ते मास्क निरुपयोगी असल्याचे तसेच ते वापरून काहीच उपयोग झाला नसता, उलट त्रास झाला असता याकडे सर्वांचे लक्ष वेधले. पण त्यांच्या या विधानाला काहीच अर्थ प्राप्त झाला नाही. ते म्हणाले  लोकांना अशा कधीही माहिती न होणाऱ्या गोष्टी न सांगता, आपण मास्क वापरण्याच्या शिक्षणासाठी एखादी मोहीम का करू नये? ज्यामध्ये ते कसे वापरायचे आणि कसे वापरू नयेत हे सांगता येईल. 

हात धुणे – बरेच लोक चुकीच्या पद्धतीने हात धुतात. परंतु आम्ही त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने सांगत नाही. उलट त्यांच्या बाथरूममध्ये सूचना लावतो. आम्ही लोकांना हात धूत असताना गाण्यातुन मदत करतो. लोकांना योग्य मास्क कसा घालायचा हे सांगून तो संदेश त्यांच्यापर्यंत जाणार नाही, त्याऐवजी आपण लोकांना सांगितले की एखादी गोष्ट व्यवस्थित तेव्हाच होते जेव्हा आपण ती योग्य पद्धतीने करतो. अशावेळी एखाद्या व्यक्तीचे योग्य वर्तन बघून लोक ती गोष्ट योग्य पद्धतीने करतात. याचा अंदाजे परिणाम म्हणजे मास्क विकत घेऊ नका ते काम करणार नाहीत या संदेशामुळे युनायटेड स्टेट्समध्ये कुठेच मास्कची विक्री झालेली नाही. अमेझॉनवर काहीतरी हास्यस्पद किंमतीत मिळाले तरच. दुसरीकडे क्युबामध्ये राष्ट्रीयकृत कारखाने जे शाळेच्या मुलांचे गणवेश आणि इतर वैद्यकीय वस्तूंचे उत्पादन करतात. अशा कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात मास्क तयार करून घेण्यात आले आणि पुरविण्यात आले.

क्युबाचा मानवतावाद – परदेशात क्युबाचे डॉक्टर्स जाऊ शकतात याला कारण क्युबाचा मानवतावादी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनच आहे. त्यांनी ब्रामरला त्यांच्या बंदरावर जागा दिली. २०१० च्या विनाशकारी भूकंपानंतर हैतीमध्ये डॉक्टर पाठविण्याची सोयसुद्धा या देशाने केली. २०१४ ला दक्षिण आफ्रिकेत इबोलाशी लढा देण्यासाठी आणि आता अलीकडे इटलीमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराला तोंड देण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थेला मदत केली. क्युबाने अशीच मदत युनाटेड स्टेट्सला कतरीना चक्रीवादळाच्या वेळी देऊ केली होती. परंतु जॉर्ज बुश प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ती लागू झाली नाही. अगदी काही काळासाठी आलेल्या आपत्तीत मदत करण्यासाठी बाहेरच्या देशांत क्युबाने आपले डॉक्टर मदतीला पाठविले आहेत. ब्राझीलमध्ये कित्येक वर्षांपासून तेथील सत्ताधारी कामगार पक्षाने क्युबाच्या डॉक्टरांचे स्वागत केले आहे. पण जेव्हा जेर बोलसॉनरो सत्तेवर आले तेव्हा ही परिस्थिती बदलली. आपल्या प्रभावी भाषणशैलीने बॉल्सनरो यांनी लोकांना सांगितले की, “हे लोक आजारी लोकांना मदत करायला नाही तर गनिमी पद्धतीने देशात घुसून भयानक पेशींनी लोकांना गुंतवून ठेवायला आले आहेत. जेर बोलसॉनरो यांनी त्यांना देशातून हाकलून लावलं. आता अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी बॉल्सनरो यांनी कोरोना विषाणू हा कल्पनेच्या पलीकडील आजार असून तो सार्वजानिक आरोग्यास खूप धोकादायक आहे असं सांगितलं आहे. वास्तविकता लक्षात आल्यावर त्यांनी क्युबाच्या डॉक्टरांना परत येण्यासाठी विनंती केली.

क्युबाविषयीच्या गुंतागुंतीचा स्वीकार –
मागच्या महिन्यात रिपब्लिकन पक्ष आणि काही लोकशाहीवादिंनी बर्नी सँडर्सची निंदा केली, कारण ते क्युबामध्ये झालेल्या क्रांतीबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वावर बोलले. त्यांनी क्युबाला हुकूमशाही राज्य म्हणून संबोधित केले आणि तिथे राजकीय कैदी ठेवतात असे सांगितले. पण टीकाकारांना त्याने काय सुरुवात केली आणि कसा शेवट केला याचा काहीच फरक पडला नाही. या उलट त्यांनी त्याच्या टीकेला ‘नारनिया स्टॅण्डर्ड’नी पारख केली. क्युबाच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवर स्प्ष्टपणे चर्चा करण्याऐवजी ते त्या बेटातील राज्याला अस्ताव्यस्त राज्य म्हणून वागवत आहेत. जसे की नारनिया मध्ये असलान (तिथला राजा) येण्याआधी सर्वकाही थंड होते आणि कोणताच आनंद नव्हता.

एका लोकशाही देशात समाजवादी भाषण स्वातंत्र्य, पत्रकारांना स्वातंत्र्य, बहुपक्षीय निवडणूका आणि कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्याच्या मुल्याना महत्व देतात. आपण क्युबाच्या बेशिस्त व्यवस्थेवर टीका करू शकतो आणि केलीही पाहिजे. परंतु कोरोना विषाणूच्या आपत्तीमध्ये क्युबाच्या मानवतावादी आणि एकतावादी दृष्टिकोनापुढे त्या सगळ्यांनी नम्र झाले पाहिजे, जे या राष्ट्राबद्दल असे बोलत असतात जणू काही ते एक न संपणारे भयानक स्वप्न आहे.

मूळ लेखक – बन बर्गीस हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि Give Them an Argument: Logic for Left या पुस्तकाचे लेखक आहेत. ते दर आठवड्याला मायकेल ब्रूक्समध्ये ‘The Debunk’ नावाने एक सेगमेंट करतात. या लेखाचा अनुवाद केलाय जयश्री देसाई यांनी. जयश्री या मुक्त पत्रकार असून त्यांना अनुवाद, शब्दांकन, प्रवासाची विशेष आवड आहे.