दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी CBI ची छापेमारी

manish sisodiya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास २० ठिकाणी सीबीआय कडून छापेमारी सुरु आहे. या कारवाई नंतर सिसोदिया यांनी ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आले नाही. यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही असं त्यांनी म्हंटल.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हंटल, सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून पहिल्या क्रमांकाचा बनलेला नाही,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

हे लोक दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामावर नाराज आहेत. त्यामुळे दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. जेणेकरून शिक्षण आरोग्याची चांगली कामे थांबवता येतील. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही . आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू जेणेकरून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस झाल्या पण काहीही बाहेर आले नाही. यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही असे म्हणत सिसोदिया यांनी विरोधकांवर निशाणा साधला.