CBSE 10th Board Result 2021 Date : सीबीएसईच्या दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन CBSE इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. आता सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षांबाबत आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे. CBSE दहावीचा निकाल आता आणखी लांबणीवर पडला आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शेड्युल जारी केले आहे.  सर्व सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थापकांना नोटीस जारी केली आहे.  या नोटीसमध्ये सीबीएससी बोर्ड नवीन शेड्युल दिला आहे.

 

 

दरम्यान यापूर्वी सीबीएसईचा दहावीचा निकाल जून मध्ये लागणार होता पण आता निकाल जुलैमध्ये लागणार आहे.  कारण CBSE मार्क  सबमिट करण्याच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. नव्या शेड्युल नुसार मार्क  अपलोड करण्यासाठी पोर्टल उपलब्ध राहण्याची तारीख 20 मे 2021 आहे.

 

या तारखेत काही बदल नाही पण CBSE मार्क सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे. सबमिट करण्याची तारीख 30 जून 2021 आहे त्यामुळे जून नंतर म्हणजेच जुलैमध्ये हे निकाल जाहीर होतील. यापूर्वी CBSE दहावी परीक्षांचा निकाल 20 जून ला जाहीर होणार असं सांगितलं होतं.  त्यावेळी शाळांना बोर्डाकडून आपले मार्क्स सबमिट करण्याची तारीख 11 जून होती पण आता कोरोनाची परिस्थिती आणि बहुतेक राज्यांमधील लॉक  डाऊन पाहता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे निकाल देखील  लांबणीवर पडणार आहे मार्क्स सबमिशन ची डेट जूनच्या अखेरची असल्याने निकाल जुलैमध्ये लागणार आहे.

 

कसे होणार मूल्यांकन?

 

CBSE दहावी बोर्ड परीक्षा 2021 साठी प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त 100 गुणांचा मूल्यांकन ठेवण्यात आले आहे.  त्यातील 20 गुण अतिरिक्त मूल्यांकन आणि 80 गुण वर्षभरात झालेल्या परीक्षा नुसार दिले जात आहेत.  आतापर्यंत बहुतेक शाळांनी परीक्षांच्या मार्क्सचा डेटा सीबीएससी पोर्टल वर अपलोड केला आहे.

You might also like