मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश : चंद्रकांत पाटील यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणा प्रश्नी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आल्यानंतर भाजपकडूनही आरक्षणप्रश्नी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे त्याला आरक्षण द्यावे, हे सांगण्यात तसेच या समाजाचे आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार हे कमी पडले आहे. या सरकारला अपयश आले आह,” अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

मुंबई येथे आज पार पडलेल्या बैठकीस विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, नारायण राणे यांच्यासह इतरही नेत्यांनी उपस्थिती लावली होती.या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण प्रश्नी रणनीती आखण्यासाठी भाजपाच्या वतीने समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजाची राज्य सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. अजून लॉकडाऊन वाढवला जात आहे. आम्ही स्वातंत्र्यानंतर कधीही न मिळालेले आरक्षण मिळवून दिल आहे. अनेक नेत्यांनी भीती व्यक्त केली होती कि, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देताना काळजी घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाने जर हा कायदा बेकायदेशीर असता तर अनेक महाविद्यालयात जे प्रवेश दिले घेणे. त्यावर आक्षेप घेतला असता.

आम्ही आजच्या बैठकीत केलेल्या चर्चेनंतर आम्ही निर्णय घेतला आहे कि, मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून या समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. आम्ही लवकरच राज्यपालांकडे मागणी करणार आहोत कि त्यांनी मराठा समाजाला ,मागास ठरवण्यासाठी मागास आयोग नेमावा. तसेच यात कोणत्याही स्वरूपात दिशाभूल न करता या समाजाला मागास ठरविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या राज्य सरकारला मराठा समाजाचे आंदोलन करू द्यायचे नाही. हे आंदोलन या सरकारला झेपणारे नाही म्हणून या सरकारकडून लॉकडाऊन वाढविण्याचे काम करीत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave a Comment