सातारा । सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नांबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्र सरकारकडे कारखान्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना गेल्या 2 वर्षांपासून सुमारे 1500 कोटी एवढी थकीत रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळं ही रक्कम लवकरात लवकर कारखान्यांना द्यावी अशी विनंती देसाई यांनी केंद्राला केली.
”८० टक्के कारखान्यांनी कर्ज काढले आहे. राज्याचे जे देणे होते ते त्यांनी दिलं. मात्र, केंद्राचं जे देणं होत ते देत नसल्या कारणाने अखेर कारखान्यांनी कर्ज काढलं. शेतकऱ्यांना हंगाम बंद होण्याच्या आत frp देण्यासाठी कारखान्यांनी कर्ज काढले असून कर्ज काढण्याच्या मर्यादा आता संपल्या आहेत. त्यामुळं जोपर्यत केंद्र थकीत रक्कम देत नाही तोपर्यन्त कारखाने चालवणे सुद्धा कठीण होणार असल्याचे ” देसाई यांनी म्हटले.
एकीकडे केंद्रसरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असे सांगत आहे आणि असे असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हक्काची frp देण्यासाठी लागणारी रक्कम अजून ही केंद्र सरकार कारखान्यांना देत नाही. या बाबत राज्यातील सर्व कारखानदारांनी व्यक्तीगत प्रयत्न केले आहेत परंतु केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आता या वर्षी कारखाने सुरू करायचे की नाही असा प्रश्न कारखादारांना पडला असून या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”