नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या तिसर्या लाटेने दार ठोठावले असून, त्यामुळे कोरोना संसर्गामध्ये मोठी झेप घेतली आहे. आठवडाभरापूर्वी जिथे कोविडची सहा ते दहा हजार प्रकरणे नोंदवली जात होती, तिथे आता ही संख्या दोन लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही अनियंत्रित वेगाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत इशारा दिला आहे. ते म्हणाले की,”कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही वेगाने वाढू शकते, त्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवले पाहिजे.”
महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह देशभरात कोरोनाची परिस्थिती अनियंत्रित होत आहे. रविवारी देशभरात सुमारे 1 लाख 80 हजार रुग्ण आढळले. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सोमवारी केंद्राने राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर पत्र लिहिले आहे. पत्रात राज्यांना कोविडच्या वाढत्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
In the present surge, 5-10% of active cases needed hospitalisation so far. The situation is dynamic & evolving, the need for hospitalisation may change rapidly. All States/UTs advised to keep watch on situation of total no. of active cases:Health Secy Rajesh Bhushan to States/UTs pic.twitter.com/vTElVzuumX
— ANI (@ANI) January 10, 2022
केंद्रीय सचिव राजेश भूषण म्हणाले की,”सध्या समोर आलेल्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये एकूण ऍक्टिव्ह प्रकरणांपैकी केवळ 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.” परिस्थिती झपाट्याने बदलत असून दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा इशारा त्यांनी दिला. ही परिस्थिती कायम राहिल्यास रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू शकते, असे सचिवांनी सांगितले.