कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड :- सचिन वझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्राचे पोलीस योग्य दिशेने तपास करत होते, त्यात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शभूराज देसाई यांनी दिली ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपासकामांमधून वझे यांना बाजूला करून त्यांची इतरत्र बदली करण्यात आलेली आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिस योग्य दिशेने तपास करत असताना केंद्राने योग्य नाही.
पुढे श्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडी सरकार दोषी असणाऱ्या कुणालाही पाठिशी घालणार नाही. वझे सेवेत नसताना शिवसेनेचे काम करत होते, मात्र ते सेवेत आल्यानंतर अधिकारी होते कोणताही अधिकारी शासकीय सेवेत असताना कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो.
चंद्रकातदादा पाच वर्षे राज्याच्या दोन नंबरच्या खात्याचे मंत्रीपद सांभाळले आहे. भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. अशा जेष्ठ व्यक्तिंनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. या प्रकरणात पोलिसांचे नांव कुठेही मलिन झाली नाही. जगभरात त्यांचे नांव असून त्यांची तुलना स्कॉटलंट पोलिसांशी केली जात आहे. महाराष्ट्र पोलिस आपल्या पध्दतीने तपास करत असताना त्यांच्यावर अविश्वास दाखणे गैरविश्वास दाखवून तपास इतरत्र देणे योग्य नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा