रेमदेसेविर इंजेक्शनचा साठा आणि काळाबाजार करणाऱ्या विरोधात कठोर कारवायीचे केंद्राचे आदेश – डॉ. हर्षवर्धन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनावरील उपचारांसाठी प्रभावी उपायांच्या कमतरतेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, सर्व संबंधितांशी या संदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याचे उत्पादन वेगवान करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी फार्मास्युटिकल कंपन्यांनी कमी कोरोना प्रकरणांमुळे रेमदेसीविरचे उत्पादन कमी केले होते. पण आता कॉरोनाच्या वाढत्या केसेस बघून ते पुन्हा वाढवण्याची गरज आहे.

परंतु आता पुन्हा करोना केसेस वाढत आहेत ज्यामुळे आता त्याची उणीव भासू लागली. औषधांच्या काळ्या विपणनाबद्दल डॉ हर्षवर्धन म्हणाले की असे करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात कोणत्याही तक्रारीवर कडक कारवाई केल्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या आधी पण रेमदेसीविर च्या निर्यातीवर बंदी घातली आहे जेणेकरून आपल्याला योग्य पुरवठा होईल.

काळाबाजार करणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी. बर्‍याच राज्यात कोरोनापासून बचावासाठी लस नसल्याबद्दल डॉ.हर्ष वर्धन म्हणाले की, केंद्राने सर्व राज्यांना लस दिली आहे. कोणत्याही राज्यात लसीची कमतरता नाही. या लसीचा उपयोग नियोजित पद्धतीने करणे ही राज्यांची जबाबदारी आहे जेणेकरुन लोकांना त्याचा फायदा होईल. काही दिवसांपूर्वी बऱ्याच राज्यांमधून सूर उमटला होता की लसींचा तुटवडा भासत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment