व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

नवी दिल्ली । कोरोना विषाणूने सध्या देशात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारच्या घरात पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन चा कालावधी वाढवून ३ मी केला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन संदर्भात नवीन नियमावली बनवली आहे. यात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली सूची केंद्र सरकारने प्रकाशित केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, सध्या देशांतर्गत विमानसेवा बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो आणि बससेवाही बंदच राहणार आहेत. या बरोबरच शाळा, कोचिंग अशा शैक्षणिक संस्थाही बंदच राहणार आहेत.

काय बंद राहणार?
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार.

हॉटस्पॉट भागांमध्ये सूट नाही
या नियमावलीनुसार, हॉटस्पॉट भागांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नाही. या भागांमध्ये आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे पालन केले जाईल. या बरोबरच कुणालाही बाहेर पडण्याचे परवानही असणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची डिलिव्हरी घरी करण्यात येईल. इथे केवळ सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच जाण्यायेण्याची मुभा असणार आहे.

आरोग्य, बँकिंगसेवा सुरू राहणार
हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लीनिक, दवाखाने, औषधांची दुकाने, मेडिकल लॅब, सेंटर्स सुरू राहतील. पॅथलॅब आणि औषधांशी संबंधित कंपन्या सुरू राहतील. तसेच बँका आणि एटीएम सुरू राहतील.

२० एप्रिलनंतर मिळणार सूट
ज्या भागांमध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण नाहीत, अशा भागांना २० एप्रिलनंतर सूट मिळणार आहे. अशा भागांची तपासणी २० एप्रिलपर्यंत केली जाणार आहे. या तपासणीनंतरच काही भागांना किरकोळ स्वरुपाची सूट देण्यात येईल. ही सूट देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या उपाययोजना केल्या जातील. कार्यालये, कारखाने आणि इतर संस्थांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे हाच या मागचा हेतू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

चिंताजनक! राज्यात दिवसभरात ३५० नवे कोरोनाग्रस्त, एकुण आकडा २६८४ वर

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…