हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी ट्विट करुन लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन दिले आहे. सरकारने सखोल आढावा घेतल्यानंतर जनहितातील लॉक-डाऊन पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यास बसपा त्याचे स्वागत करेल असे मायावती म्हणाल्या. मायावतींनी केंद्र सरकारला गरीब, दुर्बल घटक, मजूर आणि शेतकरी इत्यादींच्या हिताची काळजी व मदत करण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात मायावतींनी शनिवारी ३ ट्वीट केले. त्यांनी लिहिले, “कोरोना विषाणूच्या प्राणघातक प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवस चाललेले लॉक-डाऊन, त्याचा प्रत्येक स्तरावर सखोल आढावा घेऊन आणि व्यापक जनहिताची पूर्ण काळजी घेत, जर केंद्र सरकारने पुढील निर्णय घेण्याचे ठरविले तर बसपा त्याचे स्वागत करेल. “
1. कोरोना वायरस के घातक प्रकोप की वजह से देश में जारी 21-दिवसीय लाॅकडाउन को, इसकी हर स्तर पर गहन समीक्षा करके व व्यापक जनहित का भी पूरा-पूरा ध्यान रखकर यदि केन्द्र सरकार इसे और आगे बढ़ाने का कोई फैसला लेती है तो बी.एस.पी. इसका स्वागत करेगी।
— Mayawati (@Mayawati) April 11, 2020
पुढे त्यांनी लिहिले, “परंतु या राष्ट्रीय संकटाच्या वेळी जाती व धर्म आणि पक्षीय राजकारणापेक्षा गरीब, दुर्बल घटक, मजूर आणि शेतकरी इत्यादींच्या हितसंबंधांचा विचार करून योग्य ते निर्णय घेण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन आहे. त्यांना नक्की मदत करा. “
मायावतींनी लिहिले, “तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रस्त असलेल्या सर्व डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी,पोलिस आणि अशा प्रकारच्या सेवेमध्ये अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या सर्व लोकांच्या सर्व प्रकारच्या बचाव आणि कौटुंबिक संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारे यांनी त्वरित मदत उभी केली पाहिजेत जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.